IND Vs NZ 3rd T20: दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ सामना; कोणत्या संघाचं पारडं जड वाचा सविस्तर!

अहमदाबाद : (IND vs NZ 2nd T20, Live Streaming) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा अखेरचा टी-20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आज रंगणारा तिसरा सामना हा ‘करो या मरो’चा असणार आहे. हा निर्णयक सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघा ताकत पणाला लावणार हे मात्र निश्वित मानलं जात आहे.
पहिल्या सामन्यांत न्यूझीलंडनं भारताचा 6 विकेट्सने दारुन पराभव केला. हा पराभव भारतीय संघाच्या चांगलाच जिव्हारी लागला अन् झालेल्या सर्व चुका सुधारणा दुसऱ्या सामनात भारताने न्यूझीलंडला जागेवरच पाणी पाजलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावत आपल्या भेदक गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला अवघ्या 99 धावांमध्ये गारद केलं. हे आव्हान भारताने 4 विकेट्सट्च्या मोबदल्यात पार केलं.
त्यामुळे तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीला आली. आता या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ आपली ताकत पणाला लावून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, यामध्ये सध्या भारतीय संघाचं पारडं काहीचं जड दिसत आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळला जाणार असून भारत आणि न्यूझीलंड T20 मालिका प्रसारित करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.