क्रीडादेश - विदेश
तीन वेळा एकही धाव न करणाऱ्या; विराट कोहलीनं रचला धावांचा नवा विक्रम-वाचा सविस्तर
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या सामन्यात विराट कोहलीनं पंजाबविरोधात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये ६५०० धावांपर्यंत मजल मारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या वर्षीच्या हंगामात विराटनं खराब खेळी केली आहे. तो तीन वेळा एकही धाव न करताच तंबुत परतलेला आहे. असे असताना त्याचे क्रिकेट जगतातील स्थान अजूनही कायम आहे.
दरम्यान. विराटनं पंजाबविरोधाच्या सामन्यात १४ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. मात्र या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये ६५०० धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. ही धावसंख्या गाठण्यासाठी त्याला फक्त एका धावेची गरज होती. हरप्रीत ब्रारने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताच त्याने ६५०० धावांचा टप्पा ओलांडला.