‘मातोश्री’वर केलेल्या ‘त्या’ आरोपावरून, शिंदे गटाच्या खासदारचे घुमजाव; म्हणाले…

बुलढाणा : (Prataprao Jadhav On Uddhav Thackeray)शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना गंभीर आरोप केला होता. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला होता.
दरम्यान, जळगावचे बंडखोर खासदार प्रतापराव जाधव यांनी शनिवार दि. 1 रोजी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले होते, सुचिन वाझे यांच्याकडून ‘मातोश्री’वर दर महिन्याला 100 खोके जात होते, अशी कोणत्याही शिवसैनिकांना न पटणारी टिप्पणी जाधव यांनी केली होती. हे हावभाव त्यांना उपस्थितींच्या चेहऱ्यावर दिसले असावे म्हणूनच त्यांनी आपल्या बोलण्याचा घुमजाव करत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
ते म्हणाले, माझ्या बोलण्याचा आशय एवढाच होता, की राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आमि पोलिस अधिकारी सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी, वाझे बारमालकांकडून 100 कोटी जमा करतात, असा आरोप केला होता. वाझेंवर त्यावेळी पोलीस केसेस दाखल करण्यात आल्या, त्याची चौकशी झाली. आज वाझे आणि अनिल देखमुख जेलमध्ये आहेत. एवढंच मला म्हणायचं होतं अशी जाधव यांनी सारवासारव केली आहे.