कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, शिंदे सरकारची मोठी घोषणा!
मुंबई | Toll Exemption For Vehicles Going To Kokan For Ganeshotsav – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त मोठी घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी देणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. त्यानुसार आज (26 ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली आहे.
गणेशभक्तांना त्यासाठी आरटीओ कार्यालयातून ‘टोल पास’ घ्यावा लागणार आहे. तसंच 27 ऑगस्टपासून हा आदेश लागू होणार आहे. आरटीओ कार्यालयातून घेतलेला ‘टोल पास’ दाखवून भाविक कोकणात जाऊ शकतात.
दरम्यान, 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर असणाऱ्या टोल नाक्यांवरून जाण्याऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे.