भारतीय व्यावसायिकांबरोबर तुर्की कंपन्या करणार लवकरच भागीदारी

पुणे : पुण्यातील क्रिसेंडो वर्ल्डवाईड कंपनीने भारतीय व्यावसायिकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर भागीदारीची संधी निर्माण केली आहे. तुर्की देशातील निर्यातीची एकमेव महत्वाची संघटना टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्लीच्या साथीने उद्या ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत “ट्रेड मिशन टू इंडिया” या व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्यापारी परिषदेमध्ये फर्निचर, मार्बल, इंटिरियर डेकोरेटर्स, नर्सरी, सेंद्रिय उत्पादने आणि तुर्कीच्या मांस आणि जतन केलेले अन्न आणि बांधकाम कंपन्यांना भारतात विस्तार करण्यासाठी उत्सुक आहेत. कार्यक्रमाद्वारे भारतीय खरेदीदार, आयातदार आणि वितरकांसाठी तुर्की कंपन्यांबरोबर व्यवसाय करण्याची संधी आहे. टर्किश एक्सपोर्टर्स असेंब्लीतर्फे क्रिसेंडो वर्ल्डवाईड कंपनी प्रतिनिधीत्व करेल.तुर्की कंपन्यांच्या व्यावसायिक प्रतिनिधींना त्यांचे उत्पादन भारतीय बाजारपेठेत विस्ताराराठी तसेच भारतीय खरेदीदार, आयातदार, वितरक यांच्याशी जोडून यशस्वी व्यवसाय करार क्रिसेंडोद्वारे करण्यात येणार आहे.
ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेटिक्स, खाणकाम, फर्निचर उत्पादन, कापड, दागिने, एफएमसीजी, कृषी, रसायने आणि पशुखाद्य इत्यादी क्षेत्रांवर ‘तुर्की ट्रेड मिशन टू इंडिया’ कार्यक्रमात भर देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तारासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधी वाढवण्यासाठी भारत आणि तुर्की केंद्र उपयुक्त ठरेल. मुंबईत हॉटेल सेंट रेजिस, लोअर परेल येथे परिषद होणार आहे.