ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता दरमहा पैसे मोजावे लागणार; तर नवीन ग्राहकांसाठी सशुल्क सेवा
Twitter Blue Tick : ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरच्या व्यहारात ट्विटरचे संपादन केल्यानंतर त्यात बरेच बदल केले आहेत. यापैकी एक म्हणजे आता ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिकसह काही सेवांसाठी दरमहा काही शुल्क द्यावे लागेल. आता ही ट्विटर ब्लू सेवा भारतातही ट्विटर यूजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. भारतात Twitter Blue Tick सेवेसाठी युझर्सला 650 रुपये प्रति महिना जमा करावा लागेल. तर वेबवर ट्विटरचा वापर करणाऱ्यांना 650 रुपये दरमहा, तर मोबाईल युझर्सला मात्र जादा रक्कम मोजावी लागेल. त्यांना 900 रुपये प्रति महिना शुल्क मोजावे लागेल.
तुम्ही मोबाईलवर मासिक ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन निवडल्यास, त्यासाठी तुम्हाला दरमहा 900 रुपये लागतील. वेबवर सबस्क्रिप्शनची किंमत कमी आहे आणि त्याची किंमत प्रति महिना 650 रुपये आहे. Twitter भारतात तसेच वेबवर वार्षिक सदस्यता ऑफर करत आहे, ज्याची किंमत प्रति वर्ष 6800 रुपये किंवा अंदाजे 566 रुपये प्रति महिना आहे.
ब्लू टिकचे फायदे
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर ब्लू टिक दिसेल. जर तुमच्याकडे आधीपासून ब्लू टिक असेल तर वापरकर्त्यास ते कायम राहण्यासाठी ब्लू टिकचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. याबाबत अधिक माहिती येणे बाकी आहे.
इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, ट्विटर ब्लू सदस्यांना ट्विट प्रकाशित केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत 5 वेळा ट्विट संपादित करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय, वापरकर्ता फुल-एचडी रिझोल्यूशनचे व्हिडिओ देखील शेअर करू शकतो. ट्विटर ब्लू सदस्यांनी केलेल्या ट्विटला जास्तीत जास्त लाईक्स आणि रिट्विट्स मिळण्यासाठी त्यांना जास्त फायदेशीर ठरते.