धक्कादायक! आयपीएलमधल्या कर्णधाराच्या पत्नीचा तरुणांकडून पाठलाग, पोलिसांकडून अजब सल्ला
![धक्कादायक! आयपीएलमधल्या कर्णधाराच्या पत्नीचा तरुणांकडून पाठलाग, पोलिसांकडून अजब सल्ला rashtrasanchar latest news 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/05/rashtrasanchar-latest-news-1-780x470.jpg)
नवी दिल्ली : यावर्षीचा सोळावा आयपीएल (IPL) सीजन जोमात सुरु आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी सगळ्याच टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अशातच आयपीएल क्षेत्राशी संबंधित असलेली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएल मधील कर्णधाराच्या पत्नीचा तरुणांनी पाठलाग केल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK) कर्णधार नीतीश राणा (Nitish Rana) हिच्या पत्नीच्या कारचा दिल्लीत दोन तरुणांनी पाठलाग केला. नीतीश राणाची पत्नी साची मारवाह हिने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली. दिल्ली पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कामावरुन घरी येत असताना नीतीश राणाच्या पत्नीचा दोन तरुणांनी पाठलाग केला. दिल्लीतील क्रांतीनगरमधील फोटो साची मारवाह हिने पोस्ट केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतीश राणाची पत्नी साची मारवाह काम आटोपून घरी निघाली होती. त्यावेळी दिल्लीतील क्रांती नगर येथे दोन तरुणांनी बाईकवरुन पाठलाग केला. पाठलाग करण्याबरोबरच कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. साची मारवाह यांनी हिमतीने सामना केला. त्यांनी त्या तरुणाचे फोटो मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.
साची मारवाहने दिल्ली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आणि तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी यावेळी साचीला दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला धक्का वाटेल. पोलिस सल्ला देत म्हणाले की, ‘आता तू सुरक्षित पोहचली आहेस ना. त्यामुळे आता जे झालं ते विसरून जा. जर या पुढे अशी घटना घडली तर गाडीचा नंबर नोट करून ठेव.’