“सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी…”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
!["सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात uddhav thackeray](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/02/uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई | Uddhav Thackeray – निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (CM Eknath Shinde) दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. तसंच आज (20 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे (BJP) तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज सेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेसाठी सध्या सर्वात कठीण प्रसंग आहे. जेव्हा शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा जसा प्रसंग होता, तसा प्रसंग आत्ता आहे. बाळासाहेबांच्य मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही असं बोललं जात होतं. पण आपण जिंकलो. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा हा प्रयत्न केला आहे. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही.”
“आता जर जागे झालो नाही तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल. मिंधे गटाला नाव आणि चिन्हं दिलं आहे. कालांतराने त्यांच्यावरील जुन्या केसेस उघडणार. 28 तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह वापरू शकतो पण हे चिन्ह जरी काढून घेतलं तरी अजून दहा चिन्हे माझ्या मनात आहेत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.