ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“तुम्ही भात्यातील बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच”

मुंबई : (Uddhav Thackeray On BJP) शिवसेनेच्या 40 आमदारांनी सेनेशी बंडखोरी करुन भाजपच्या मदतीनं नवीन सरकार स्थापन केलं. आमदार, कार्यकर्ते फुटल्यानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात केले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरी बाणा दाखवत बंडखोरांसह भाजपला कडक शब्दात ठणकावलं आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. 

यावेळी ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत फूट किंवा बंडखोरांनी झाली नाही तर शिवसेना ही भाजपने पाडली आहे. भाजपच सेनेला संपवत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र एक लक्षात ठेवा, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळालात तरी धनुष्य माझ्याकडे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह बंडखोरांना इशारा दिला आहे.

दरम्यान, झालेल्या बैठकीत ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते, यावेळी त्यांनी भाजपला चांगलचं ठणकावलं आहे. तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडं आहे, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये