ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

“…तर २०२४ ची निवडणूक शेवटची असेल”, निवडणूक आयोग ताशरे ओढत, ठाकरेंचं मोठं विधान!

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) आज जी परिस्थिती भाजपने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक हि शेवटची ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं आहे. हा पूर्वनियोजत कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. मी मॉं आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाही.

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावरही संताप व्यक्त करत निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. “आत्ताचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेच ही आमची मागणी आहे”, असं ते म्हणाले. यावेळी पक्षनिधीवर बोलताना ते म्हणाले. “पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. नाहीतर निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह आणि नाव ठरवण्याचा अधिकार आहे. देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये