देश - विदेश

शिवसेनेचा बालेकिल्ला कोसळताना उद्धव ठाकरेंना पाहावेना, घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

नाशिक : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेनेत मोठा भूकंप झाला. सर्व महाराष्ट्राला या भूकंपाचे हादरे बसले मात्र, मुंबई आणि नाशिक हे दोन शिवसेनेचे (Shivsena) बालेकिल्ले शाबूत राहिले होते. मात्र आता एक-एक बुरुज ढासळण्यास सुरुवात झाली आहे.

आमदार, खासदार यांच्या बंडखोरीनंतरही तळागाळातले शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीमागे भक्कम उभे राहिलेले दिसत होते. मात्र, आता सहा महिन्यानंतर चित्र बदलताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे बारा माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला.

दरम्यान, आणखीन काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा असताना आता नाशिकमधील डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरणार आहेत. या महिन्याच्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये (Nashik) येणार असून ते जाहीर सभा घेणार आहेत.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ज्या मतदारसंघातील आमदार खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे गटातील नेते सभा घेत आहेत. नाशिक हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. येथील शिवसैनिक, पदाधिकारी नेते ठाकरेंसोबतच असल्याचे चित्र दिसत होते.

नाशिक महापालिकेचे बारा माजी नगरसेवक आणि त्यांची शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी, (Bhausaheb Chaudhari) आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील (Sunil Patil) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाचे चित्र बदलले. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून ही गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये