“शासकीय अधिकारी हे पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात त्यामुळे…”, नितीन गडकरींचं सूचक विधान

मुंबई | Nitin Gadkari – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमी त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आता देखील ते पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शासकीय अधिकारी हे पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात, असं सूचक विधान नितीन गडकरींनी केलं आहे.
इकाॅनाॅमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने MONCON या खाण विषयासंदर्भातल्या परिषदेत नितीन गडकरी बोलत होते. शासकीय अधिकारी हे पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात त्यामुळे कित्येक वर्ष ते विविध विकास कामांच्या फाईल अडवून ठेवतात अशा लोकांच्या कामांचं ऑडिट व्हायला हवं, असं नितीन गडकरी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे दोन वर्षांत मी बांधू शकलो, एक लाख कोटींचा प्रोजेक्ट कमी वेळात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण माझ्या घरासमोरचा एक किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ण होत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. गडकरींच्या घरासमोरचा केळीबाग रोड तयार करण्यासाठी 11 वर्षात 30 बैठका घेतल्या. तरी हे काम काही पूर्ण होत नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी उघड केली.