ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर राडा! बेळगावात जाणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं

कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात तसेच कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचं आयोजन केले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत कर्नाटक पोलिसांनी या मेळाव्यास परवानगी नाकारली होती. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक कोल्हापुरातील ताराराणी चौकातून भगवी रॅली घेऊन बेळगावसाठी रवाना झाले. मात्र पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून बेळगाव येथे सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते. तसेच या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले होते. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समर्थनासाठी या मेळाव्याला यावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने या महामेळाव्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात येण्यास बंदी केली आहे.

या मेळाव्यासाठी आज सकाळी शिवसेना या मेळाव्यासाठी आज सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व नेते बेळगाव येथील या मेळाव्यासाठी निघाले होते. हे कार्यकर्ते बेळगाव सीमेवर पोहोचले असता, यावेळी कोल्हापुर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी त्यांना कर्नाटकमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल येथे आणून सोडलं. यावेळी आंदोलकांनी मोठी घोषणा बाजी केली. महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांचे विरोधक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य पोलिसांनी आम्हाला का अडवलं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार हे मिलेजुले सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

 उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व नेते बेळगाव येथील या मेळाव्यासाठी निघाले होते. हे कार्यकर्ते बेळगाव सीमेवर पोहोचले असता, यावेळी कोल्हापुर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी त्यांना कर्नाटकमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल येथे आणून सोडलं. यावेळी आंदोलकांनी मोठी घोषणा बाजी केली. महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांचे विरोधक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य पोलिसांनी आम्हाला का अडवलं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार हे मिलेजुले सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये