ताज्या बातम्यारणधुमाळी

महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर मनसेची कारवाई, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | MNS Suspended Party Worker Beaten Up Women – काल (1 सप्टेंबर) मुंबईतील मुंबादेवी परिसरात मनसेच्या विनोद अरगिले नावाच्या पदाधिकाऱ्याने गणपती मंडपावरून एका महिलेला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच या प्रकारावर सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून जोरदार टीका केली जात आहे. याच दरम्यान आता मनसेनं याबाबत मोठी कारवाई केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.

बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या वतीने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “1 सप्टेंबर रोजी कामाठीपुरा या परिसरात घडलेली घटना पाहून मन विषण्ण झालं. पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी महिलांचा सदैव आदर केला आहे. तशाच प्रकारचा आदेश कार्यकर्त्यांना दिला असूनही ही घटना घडली याबाबत मी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहे. याबाबत पक्षानं कठोर भूमिका घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून कामाठीपुरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले याना पदमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती घेऊन, सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. महिलांचा व ज्येष्ठांचा आदर-सन्मान राखला गेलाच पाहिजे”, असं या पत्रात नमूद केलं आहे.

mns

दरम्यान, मुंबादेवी परिसरात गणपतीसाठी मनसेचा फलक लावण्यात येत होता. त्या ठिकाणी प्रकाश देवी यांचं औषधाचं दुकान आहे. त्यासमोर खांब उभारण्यात आला होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे हे सहकाऱ्यांसह तेथे हजर होते. त्यावेळी प्रकाश देवी यांनी त्यास विरोध केला. ताबडतोब हे सगळे काढून टाका असं त्यांनी सांगितलं. त्यावरून विनोद अरगिळे व प्रकाश देवी यांच्यात वाद झाला आणि त्यातून विनोद अरगिळे यांनी त्या महिलेस ढकलून दिले व मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये