चुलत भावाचे ज्याने घराच्या समोर…, त्या राणेची नार्को टेस्ट करा, विनायक राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : (Vinayak Raut On Narayan Rane) एकानाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेना खिळखिळी झाली आहे. याचाच फायदा घेत राणे पिता-पुत्रा ठाकरे कुटुंबावर जहरी टीका करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, त्यानंतर राणे कुटुंबावर शिवसेनेकडून सडकून टीका करण्यात आली. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी शिवसेनेकडून लावून धरली आहे. खासदार विनायक राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंवर तोंडसुख घेण्यासाठी नितेश राणे निघाला आहे. तुझ्या बापाच्या राजकारणाची कारकिर्द आठव. सख्ख्या चुलत भावाचे ज्याने घराच्या समोर डोके फोडले. एवढच नाही गाडीत घालून नांदगावला नेवून जाळून टाकलं, अशी तुमची औलाद, असा हल्लाबोल राऊत यांनी राणेंवर केला.
नारायण राणेंच्या कारकिर्दीत जेवढे लोक बेपत्ता झाले, जेवढे खून झाले, या सर्वाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. तसेच नारायण राणे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, म्हणजे वाचा फुटेल आणि कळून येईल कोणाचा इतिहास रक्तरंजीत आहे, असंही राणे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. नारायण राणेंकडून आणि त्यांच्या पुत्रांकडून सातत्याने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं केलं जात. वास्तविक पाहता, सीबीआयने या प्रकरणी क्लिनचीट दिली आह