किंग कोहलीच्या रडारवर, ‘हे’ तीन दिग्गज खेळाडू…

IND Vs BAN Test Match 2022 : एकदिवशीय मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केल्यानंतर झुंजार बांगलादेश कसोटीमध्ये देखील भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना हा 14 डिसेंबरपासून झाहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू होणार आहे. या कसोटीत भारताची रन मशीन विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठमोठे कारनामे करण्याची नामी संधी रोहित शर्माच्या गैरहजरीमुळे चालून आली आहे.
विराट कोहलीसाठी बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका खास असणार आहे. 2019 मध्ये विराट कोहलीने आपले 70 वे शतक बांगलादेशविरूद्धच ठोकले होते. हे शतक कसोटी सामन्यात ठोकले गेले होते. विराटने पहिल्या कसोटीत शतक झळकावले तर तो स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट यांच्याशी कसोटी शतकांच्या बाबतीत बरोबरी करेल. तसेच सर्वाधिक कसोटी शतके ठोकण्याच्या रेसमध्येही तो पुन्हा एकदा सामील होईल. त्यामुळे मिळालेल्या संधीच्या विराट किती उपयोग करून घेतो आणि त्याच्या चाहत्यांना तो किती खुश करतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
या दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांत विराट कोहली शतक ठोकरे तर तो, स्मिथ आणि रूटलाच या कसोटीत मागे टाकू शकतो असे नाही तर त्याच्या रडारवर सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील असणार आहेत. जर या मालिकेत विराट कोहलीने अजून 169 धावा केल्या तर तो कसोटीत बांगलादेशविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत द्रविडला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो. या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे.