‘द कश्मीर फाइल्स’ दिग्दर्शकाचा रिचा चड्ढावर भारतविरोधी असल्याचा आरोप!
!['द कश्मीर फाइल्स' दिग्दर्शकाचा रिचा चड्ढावर भारतविरोधी असल्याचा आरोप! Vivek And Richa](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/Vivek-And-Richa-780x470.jpg)
मुंबई : (Vivek Agnihotri On Richa Chadha) बॅालिवूड आभिनेत्री रिचा चड्ढा सध्या एका ट्वीटच्या वादामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने ट्वीटमध्ये गलवान खोऱ्याचा उल्लेख करत भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान आता या वादग्रस्त ट्विटवर ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील रिचा चड्ढावर गंभीर आरोप केला आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,”रिचाच्या ट्वीटचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण तिच्या मनात जे होतं ते तिने लिहिलं आहे. ती भारतविरोधी आहे हे तिच्या ट्वीटवरुन जाणवतं. पण तरी ही मंडळी बॉलिवूडवर बहिष्कार का घालता असा प्रश्न उपस्थित करतात”.
रिचा चड्ढाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एका ट्वीटमुळे बॉलिवूडमधील अनेक मंडळी रिचाच्या विरोधात गेली आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या आधी अक्षय कुमार, अनुपम खेर, केके मेनन आणि सिने-निर्माते अशोक पंडित यांनीदेखील रिचाच्या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यामुळे येत्या काळात रिचाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.