चिकनगुण्या झाल्यावर काय केले पाहिजे?

चिकनगुण्या झाल्यावर काय केले पाहिजे? भरपूर पाणी प्यावे, फळे खावीत. शिळे अन्न खाऊ नये. उघडयावरील अन्नपदार्थ वर्ज्य करावेत. पुरेसा हलका आहार घ्यावा. औषधोपचारांसह विश्रांती आवश्यक आहे. गर्दीत जाणे टाळावे. चिकनगुण्या आणि होमिओपॅथी पावसाळयाच्या दिवसात कमी सूर्यप्रकाश व दमट हवामान यामुळे विषाणूंचा प्रादुभाव होऊन रोगांची लागण होण्यास सुरुवात होते. डेंग्यु, मलेरिया, व्हायरल फिव्हर याचबरोबर महत्वाचे म्हणजे चिकनगुण्याची लागण या काळात होते.
रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे चिकनगुण्याची लागण झालेल्या रुग्णास सांधेदुखी, पायांना गोळे येणे, हालचाल केल्यास वेदना वाढणे असे त्रास होतात. थंडी वाजून ताप येतो; परंतु घाम येत नाही. डोकेदुखी, अंगदुखी जिभेला कोरडेपणा जाणवतो. तहान लागत नाही. भूक मंदावते, उलटया होतात मळमळए व अशक्तपणा येतो.
“एडिस इजिप्ती” नावाचा डास चावल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीकमी असलेल्यांना चिकनगुण्या हा आजार होतो. मग डास चावू नये. यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? डास चावू नये याची खबरदारी घ्यावी, त्यांची प्रजननस्थळं नष्ट करावीत. पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत. खिडक्या व दरवाजे यांना सुरक्षित जाळी बसवून घ्यावी. चिकनगुण्यासाठी होमिओपॉथिक औषधोपचार
ब्रायोनिया अल्बा : ताप येऊन थंडी वाजते. संपूर्ण अंग ठणकते, बोट लावल्यावरसुद्धा शरीराला सहन होत नाही. हालचाल केल्यावर वेदना वाढतात. विश्रांती घेतल्यावर बरे वाटते. चेहरा लाल होतो, उष्णतेमुळे त्रास होते. ताप कमी होत नाही. आजाराविषयी साशंक मरणाती शिंती वाटते. अशी लक्षणे रूग्णांमध्ये आढळल्यास ब्रायोनिया अल्बा हे होमिओपॅथिक औषधे गुणकारी ठरते.
रस टॉक्स स्नायू जखडल्यासारखे होतात, सूज येते, थंड हवा, दमट वातावरण, अतिश्रमामुळे गुरगळल्यामुळे त्रास होतो. गरम पाण्याच्या आंघोळीगुळे, सतत चालल्यामुळे, दुखणा-या भागाला दाबल्यावर बरे वाटते. रूग्ण हा बैचेन, एका ठिकाणी न बसणारा, काळजी करणारा, मदतहीन, अतिशय दुःखी स्वभावाचा, योग्य व पाहिजे तेवढे बोलणारा, भित्रा, विसरून व गोंधळून जाणारा असतो.
कॅरिका पपया चिकनगुण्याच्या आजारात रूग्णांच्या प्लेटलेटचे प्रमाण कमी होते यासाठी गुळमात्रामध्ये कॅरिक पपया या औषधाचे २७-२७ थेंब दिवसांतून ४-५ वेळा रूग्णास दिल्यास प्लेटलेटचे प्रमाण वाढण्यास मदत होते. चिकनगुण्या व डेंग्यु या आजारामध्ये हे अतिशय गुणकारी औषधे ठरले आहे
चायना ऑफिसिनेंलिस
हालचाल केल्यावर सांधेदुखी वाढते तर दुखणा-या भागास दाब दिल्यास रूग्णांस बरे वाटते. सांधे झिजल्यासारखे वाटतात. सकाळी बसून राहिल्यास त्रास वाढतो. थंडी वाजण्याची सुरुवात ही छातीपासून होते. त्यानंतर तहान लागते, त्यानंतर गरम होते. परत तहान लागते. चेहरा लालबुंद होतो तर हात थंड पडतात. प्रचंड थकवा जाणवतो.
दुखणा-या भागास दाबल्यावर, सैल कपडे, घातल्यास गरमीमध्ये, खोलीत बंदिस्त राहिल्यास रूग्णांस बरे वाटते, अशी लक्षणे दिसल्यास चायना ऑफिसिनॅलिस हे औषध उपयोगी ठरते.
इपिटोरीयम परफोलिटग स्नायू अशक्त होतात. हाडांना प्रचंड वेदना होतात, हाडे तुटल्यागत वाटतात, रूग्ण बैचेन होतात. गळगळ व थंडी सहन होत नाही. उलटी झाल्यावर, घाम आल्यावर रुग्णांस बरे वाटते. या औषधाबरोबरच पॉलीपोरस पीनीकोला, अर्सेनिकग अल्बम, नक्स ओमिका, अल्फा अल्फा, अकोलाईट, बेलाडोना, सलफर, जल्सेगियम, लायकोपोडियम इ. अनेक औषधे तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्लानुसार घेतल्यास चिकनगुण्यापासून रूग्ण मुक्त होऊ शकतो.