ताज्या बातम्यारणधुमाळी

‘केंद्र सरकार जेव्हा…’; इंधन दरवाढीवरुन मोदींनी सुनावल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई : आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्रासह काही राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावं घेतली आणि खडे बोल सुनावले आहेत. यावेळी देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींच्या या विधानांवर मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तर दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “राज्याच्या निर्णयाने फक्त दोन ते तीन रुपयांचा फरक पडतो. केंद्र सरकार जेव्हा कच्च तेल विकत घेतं तेव्हाचे कर आणि नंतर राज्यांच्या कराचा प्रश्न येतो. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त आहे. फार काही आभाळाएवढा फरक नाही”.

“मला फक्त महाराष्ट्राला इतकंच लक्षात आणून द्यायचं आहे की, केंद्र महाराष्ट्राला २६ हजार कोटी रुपये देणं लागतं. केंद्राच्या धोरणानुसार कोळसा अडवला गेला आहे. जिथे मिळेल तिथे महाराष्ट्राचा गळा दाबण्यात आला आहे. आमचे २६ हजार कोटी दिलेत तर बंर होईल. तुम्ही सांगाल तो कर आम्ही गायबच करुन टाकू. म्हणजे तुम्ही जेवायलाही देणार नाही, ताटही देणार नाही आणि जेवण करुन फ्रेश व्हा सांगणार,” असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये