आरोग्यताज्या बातम्यारणधुमाळी

कौतुकास्पद! पत्रकाराला चक्कर आल्यावर भागवत कराडांमधील जागा झाला डॉक्टर, पाहा व्हिडीओ!

नवी दिल्ली | Minister Bhagwat Karad’s Video Viral – केंद्रीय राज्य मंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. भागवत कराड यांनी कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला आरोग्यविषयक सहकार्य केले आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या भागवत कराड  यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत एका कॅमेरामनचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री हे पेशाने शल्य-चिकित्सक आहेत.

भागवत कराड हे दिल्लीतील ताज मानसिंग येथे मुलाखत देत होते. त्यावेळी ही मुलाखत कव्हर करण्यासाठी आलेला एक फोटोग्राफर बेशुद्ध पडला. हे पाहून डॉक्टर कराड तातडीने मदतीसाठी पोहोचले आणि त्यांनी नाडी तपासली. यानंतर त्यांनी पल्स रेट वाढवण्यासाठी कॅमेरामनचे पंजे दाबण्यास सुरुवात केली.

सुमारे ५-७ मिनिटांनी कॅमेरामनची प्रकृती सुधारली. यानंतर भागवत कराड यांनी ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी मिठाई खाऊ घातली. तसंच हे प्रकरण समोर आल्यानंतर लोक त्यांचं कौतुक करत आहेत. योगगुरू स्वामी रामदेव यांनीही डॉ. कराड यांच्या कार्याचे कौतुक केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात ट्विट करत भागवत कराड यांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये