गर्भसंस्काराला एवढे का महत्त्व द्यावे!

आपलं बाळ सुदृढ व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. बाळाची चाहूल लागली की, घरातील वातावरण आनंदी होतं. बाळ सुदृढ होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं काय असेल तर गर्भसंस्कार. खरंतर गर्भसंस्कार हे आपल्या पुरातन काळापासून चालत आलेला एक संस्कार आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू आणि शिवाजी राजे. पण आता त्याला मान्यतासुद्धा मिळाली आहे. अनेक शोध लागले. त्यात असं कळून आलं की, आईच्या पोटामधील बाळ तिचं आणि तिच्या आजूबाजूच्या वातावरणाचे अनुकरण करीत असतं. चला तर मग आज थोडं गर्भसंस्कार याबद्दल माहिती बघूया.
गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मूल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय. खरंतर गर्भसंस्काराची सुरुवात गर्भधारणेच्या अगोदरच होते. गर्भसंस्कार का करावेत? बाळाचा ५० टक्के मेंदूचा विकास हा गर्भात होत असतो. बरं का मंडळी, हे मी आपल्या मनाने नाही सांगत, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. आध्यात्मिक आणि पारंपरिक दृष्टीनेसुद्धा पूर्वीच्या काळापासून याला महत्त्व दिले जाते. आजकाल यासाठी बरेचसे शिक्षावर्ग घेतले जातात. सोप्या पद्धतीने घरी आपण तो कसा करावा याबद्दल मी तुम्हाला सांगते. नऊ महिने पोटात वाढवणार्या आईच्या मनःस्थितीवर बाळाचे आरोग्य पूर्णपणे अवलंबून असते. यासाठी आईने आपली मनःस्थिती ठीक ठेवण्यासाठी सकारात्मक पुस्तकांचे वाचन करणे हा पण एक गर्भसंस्कार आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवणे, आनंदात राहणे.
गर्भधारणेमध्ये अनेक संप्रेरके निर्माण होतात, त्यामुळे मनात भीती निर्माण होणे, वाईट विचार येणे हे होऊ शकते म्हणून सकारात्मक पुस्तके जरी वाचली तर त्याचा आपल्या मनावर आणि बाळाच्या मनावर योग्य असा परिणाम होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मातेने बाळाशी संवाद साधणे. आपण जसं एकमेकांशी बोलतो, घरात काय करणार आहोत, काय नाही काय बरं, काय वाईट आहे, आपण बोलत असतो तसंच बाळाशी संवाद साधणं खूप महत्त्वाचे असते. तिसर्या महिन्यापासून आपण काय करतो आहे, काय नाही करीत, आपल्या आजूबाजूला कोणते आवाज येत आहे हे बाळाला पूर्णपणे ऐकायला येतं. म्हणून चांगले सकारात्मक संगीत ऐकल्यास बाळाला आणि आईला दोघांनाही आनंद मिळतो.
असेसुद्धा लक्षात आले आहे की, बाळाला जर एक विशिष्ट प्रकारचे संगीत किंवा बोलणं आवडलं तर त्याच्या हालचाली तुम्हाला वाढलेला जाणवतात. गर्भसंस्कार हा आईने वडिलांनी मिळून असा संवाद साधल्यास अतिउत्तम. ओमकार करणे. गर्भसंस्कारात ओंकार याला विशेष महत्त्व दिले आहे. ओंकाराने मातेला पहिल्या तीन महिन्यांत होणारा पित्ताचा त्रास कमी होतो आणि वाईट विचार येत नाही आणि बाळाच्या मेंदूचा विकाससुद्धा खूप छान होतो. योगा व मेडिटेशन करणे, यांनीसुद्धा मातेची आणि बाळाची मानसिकता योग्य राहते.
डॉ. ईश्वरी जोशी नानोटी, (एमडी) होमिओपॅथी मेडिसीन्स