राहुलने दर्शनाची हत्या का केली ? धक्कादायक कारण आले समोर, जाणून घ्या …

पुणे | Darshana pawar murder case – एमपीएससी परीक्षेत जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकवणऱ्या दर्शना पवारच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता ह्या प्रकरणात आरोपी ठरलेल्या राहुल हंडोरे या व्यक्तीचा शोध लागला आहे. त्याला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले . बेपत्ता असलेला हा आरोपी दर्शनाच्या मृत्यूच्या तब्बल पाच दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला आहे .
पुणे (pune) जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. १२ तारखेला राजगडावर दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला . त्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले होते. दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार १५ जून रोजी तिच्या पालकांनी नोंदवली होती.
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांना फक्त ओळखतच नव्हते तर ते नातेवाईक होते . दोघांनीही सोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. परंतु एमपीएससीमध्ये यश दर्शनाला आधी मिळाले. दोघांना अधिकारी होऊन दर्शनासोबत लग्न करायचे अशी राहुलची इच्छा होती. परंतु तो एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही, हीच मोठी लग्नासाठी अडचण ठरली.
दर्शनाच्या घरच्या मंडळींनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले होते. लग्नाची तयारीसुद्धा सुरु झाली. या सर्व गोष्टींमुळे राहुल हंडोरे बेचैन होता. त्याने दर्शनाला अन् तिच्या कुटुंबियांना एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे तो सांगत होता. मात्र दर्शनाच्या घरच्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे राहुलने दर्शनाला संपवण्याचा निर्णय घेतला.