पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढवणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सातारा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा वारंवार होत असतात. तसंच सध्या पार्थ पवार कारेगाव विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भता भाष्य केलं आहे. “पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, “पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे. माध्यमांनीही खूप महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. अतिरंजित बातम्यांना प्राधान्य न देता समाजात शांतता, जातीय सलोखा राहील आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेवटी माध्यमांची विश्वासार्हताही महत्त्वाची आहे.”