पाण्याचा टँकर अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू

दुचाकी व पाण्याच्या टँकरच्या अपघातात महिलेच्या अंगावरून टँकर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी हिंजवडी फेज दोन येथे घडला.
याप्रकरणी टँकर चालक लाला सुभाष खुडे (वय ३२ रा. माणगाव) त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात नकुल किशोर अखारे (वय ३१ रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गुंजन या फिर्यादीच्या बहीण होत्या. गुंजन या त्यांच्या पतीसह दुचाकीवरून जात होत्या ..आरोपी. त्याच्या ताब्यातील पाण्याचा टँकर घेऊन जात असताना त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने चालवून गुंजन यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यावेळी गुंजन यांचे पती व त्या गाडीवरून खाली पडल्या. यात गुंजन यांच्या अंगावरून पाण्याचा टँकर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.