क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

वेळापत्रक जाहीर अन् पाकड्यांचा माज उतरला! Ind Vs Pak हाय व्होल्टेज सामना ‘या’ तारखेला होणार

World Cup 2023 Schedule IND vs PAK : बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात आशिया कपच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर पीसीबीने भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्येही न खेळण्याची धमकी दिली होती. त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची देखील मागणी केली.

नुकतेच जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून सामन्याची ठिकाणे बदलण्याच्या केलेली मागणी आयसीसीने धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तानचा हट्ट, आडमुठेपणा अन् माज सर्व उतरला. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत 46 दिवस हा क्रिकेटचा कुंभमेळा सुरू राहणार आहे.

भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी धुडकाडून लावली आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताचा सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.







Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये