देश - विदेश

Next PM अमित शाह?

लखनौ : प्रशांत किशोर यांना प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचा सर्वात यशस्वी नेता कोण असू शकतो? असा सवाल केला. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतले. येथे झालेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांना भाजपपासून, काँग्रेस आणि जेडीयूपर्यंत विविध प्रश्न विचारण्यात आले. पण रॅपिड फायर राऊंडमध्ये जेव्हा प्रशांत किशोर यांना विचारण्यात आले की, मोदींनंतर भाजपचा सर्वात यशस्वी नेता कोण असू शकतो? तर या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतले.

ते म्हणाले की, आजच्या तारखेला अमित शाह हेच मोदींनंतर यशस्वी नेता असू शकतात. मात्र, यावेळी प्रशांत किशोर यांना योगी आदित्यनाथ यांचादेखील पर्याय देण्यात आला होता. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. कारण प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटदेखील घेतली होती. तसेच काँग्रेसला सक्षम करण्यासाठी ब्लू प्रिंटदेखील दिली होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ते काँग्रेस पक्षात सरचिटणीसपदासाठी इच्छुक आहेत का? असादेखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सध्याच्या काँग्रेसच्या घटनेनुसार सर्व कामे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मी काँग्रेसमध्ये काही आवश्यक बदल सुचवले होते, जे पक्षाने मान्य केले नसल्याचेही ते म्हणाले. राजकीय नेता होणार का? असाही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी बिहारमध्ये पदयात्रा काढणार आहे, नंतर निर्णय घेईन.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये