दो मस्ताने… शिव आणि अब्दुवर ‘अंदाज अपना अपना’ची जादू

मुंबई : बिग बॉस 16 च्या घरातील चमकते सितारे अब्दु रोजिक आणि शिव ठाकरे नुकतेच एकत्र वेळ घालवताना दिसले. यादरम्यान अब्दु आणि शिव दोघेही सलमान खानच्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाना’ या लोकप्रिय गाण्यावर मस्ती करताना दिसले. त्याचवेळी दोघेही एकमेकांशी क्यूट पिलो फाईट करताना दिसत आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक हॉटेलच्या लॉबीमध्ये डान्स करताना, कार्पेटवर झोपताना, नंतर खोलीतील बेडवर उडी मारताना आणि पिलो फाईट करताना दिसत आहेत. आमिर खान आणि सलमान खान यांचे दो मस्ताने चले जिंदगी बनाना हे गाणे मागे ऐकू येत आहे. शिव ठाकरेनी हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर केला आहे, तर त्यांनी व्हिडिओमध्ये अब्दूला टॅग केले आहे. या व्हिडिओला शिवने एक मस्त कॅप्शन दिले आहे. शिवने त्याच्या आणि अब्दूच्या नावाचा हॅशटॅग बनवला आणि लिहिले- ‘शिबडू #शिबदू रब ने बना दी जोडी’. अब्दूनेही व्हिडिओवर कमेंट करत लिहिले – ‘ब्रदरली लव्ह’.