आरोग्यताज्या बातम्यादेश - विदेश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार बुस्टर डोस

नवी दिल्ली : नुकताच केंद्र सरकारने कोरोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १० एप्रिलपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकाना बूस्टर डोस मिळेल. तसंच खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

तसेच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगणयात आलं आहे.  

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये