ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

जगात ‘बोको हराम’ संघटना, महाराष्ट्रात ‘खोके हराम’; शिवसेनेची शिंदे गटावर टोका!

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र बदनाम झाला असून जगात बोको हराम संघटना आहे, आणि राज्यात खोके हराम संघटना असल्याची सडकून टिका शिवसेनेने बंडखोरांवर केलीय. खोके हराम गटाचे अस्तित्व फार काळ राहणार नसल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे. निधीमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडीने शिंदे गटाविरोधात जोरदार घोषनाबाजी देखील करण्यात आली होती.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले की, विधीमंडळ अधिवेशनात खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आला आहे. पुर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादून वगैरे उपाध्या लावल्या जात होते. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांच्या आडनावापुढे देखील वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीनी या चोरांच्या पुढच्या पिढीला कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप’ भाई’ आजोबा खोकेवाला था!

महाराष्ट्रात ब देशात जेथे जाईल तेथिल लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत असल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, महाराष्ट्रातील खोक्यांचा फाॅर्म्युला वापरुन ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरु झाला आहे. बिहारमध्ये देखील राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, महाष्ट्रात जो खोके देवून आमदार पळवण्याचा प्रयत्न फेल झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये