अवेळी लागणार्या भुकेवर नियंत्रण कसे मिळवायचे?

बरेच पेशंट अशी समस्या घेऊन येतात की, पूर्ण पोटभर जेवण केल्यावरही चॉकलेट खाण्याची अथवा गोड खाण्याची इच्छा होते. जेवणानंतर लगेच दोन तासांत भूक लागते. त्यावेळेस काय खावं किंवा वारंवार खाण्यामुळे वाढणार्या वजनावर कसा उपाय करावा असे?
वारंवार होणारे जंकिंग, बाहेरील चमचमीत पदार्थ खाण्याची आवड यावर नियंत्रण करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण या सगळ्या गोष्टींसाठी आपला मेंदू साथ देत नाही. तर पोटभर जेवणानंतर असे वाटते की, काहीतरी खात राहावे अशा समस्येतून बाहेर येण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. प्रोटिन्स लेपटिन नावाचा हॉर्मोन सिक्रीट करतात. लेपटिन आपल्या मेंदूला अशी सूचना देत राहते की, पोट भरले आहे आणि शरीराला खूप ताजेतवाने, ऊर्जावान वाटत आहे. त्यामुळे अतिरिक्त खाण्यापासून आपण स्वतःला थांबवू शकता.
आहारात करा खालील पदार्थांचा समावेश :
- काळे मनुके अथवा काळी किंवा हिरवी द्राक्षं.
- साखर विरहित द्रवपदार्थ ताक, नारळपाणी, दूध, दही, सूप.
- खोबर्याचे तेल, ऑलिव्ह ऑइल अथवा जवस तेल.
- डाळी.
- मोड आलेल्या उसळी
- मासे, अंडी.
- हिरव्या भाज्या, सॅलड.
- ग्रीन टी
- मशरूम
- तेलबिया : सूर्यफूल, जवस, पंपकिन सीडस, चिया सीड्स.
- शरीरात लेपटिन जर योग्य प्रमाणात तयार झाले तर आपण आपल्या बॉडी मास इंडेक्सवर नियंत्रण करू शकतो. यासाठी करायला हवे आहारात खालीलप्रमाणे बदल…
- आहारात तंतुमय, चोथायुक्त पदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ ः कच्च्या भाज्या, कोशिंबीर, सॅलड.
- अतिगोड फळांचे सेवन जेवताना न करता थोड्या अंतराने किमान दोन ते चार तासांनी करावे.
- कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहारात असावीत. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून बनवलेले पदार्थ खावेत. मैदायुक्त पदार्थ टाळावेत.
- नाश्त्यामध्ये प्रोटिनयुक्त आहार यांचा समावेश करावा.
- आठवड्यातून किमान एक वेळा मासे खावे व शाकाहारींनी जवस, कारळ, सूर्यफूल नियमित खावीत.
- हायइन्टेन्सिटी एक्सरसाइज म्हणजे जास्तीत जास्त कॅलरीज खर्च करणारे व्यायाम करावेत.
- सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी.