एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना मागे कोण? याचा मुंबई पोलिस घेणार शोध; गृहमंत्री वळसे पाटिल

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना मागे कोण आहे याचा शोध मुंबई पोलिस घेणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. एसटी महामंडाळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली. यावेळी कर्मचाऱ्यांकडून दगडफेत, व चप्पलफेक करण्यात आली. आंदोलक कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली.
या आंदोलनमागे कोण आहे? याचा शोध मुंबई पोलिस घेणार असल्याची माहिती, गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज पञकारांशी बोलताना दिली. असे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा कोणीही मोठा नेता नव्हता. त्यामुळे या आंदोलकांना कोणी भडकवले आहे का? याचा तपास केला जाणार आहे. कोणाच्या सांगण्यवरून आंदोलक येथे आले याची चौकशी केली जाणार आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. हे अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही असेही यावेळी ते म्हणाले.