फुड फंडा

चहाप्रेमींना भुरळ पाडणारा आमचा-तुमचा ’जायका चाय’

गोड पदार्थ खाणं आपण एकवेळ टाळू शकतो, पण चहा नसेल तर कसं होणार… खूप नाही तरी सकाळी आणि रात्रीचा चहा अनेक जणांना हवाच असतो. मात्र सध्याच्या काळात चहा पिण्यासाठी वेळ बघितली जात नाही. मग कोणी काम करून कंटाळलं असेल तर चहा हा लागतोच, तर कोणी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत असेल तर चहाची सोबतही असतेच, तर कोणी प्रवास करताना वाटेत थांबून चहाचा आस्वाद घेतात. तर अशाच चहाप्रेमींसाठी श्री. सोमेश गणपत साकोरे यांचं ‘जायका चाय’ शाखा नं. ७ हे हॉटेल २०१९ पासून प्रसिद्ध आहे. ‘जायका चाय’ हे शिंदे ग्रॅण्ड हॉटेल नं. १, पुणे-नाशिक हायवे भोसरी, पुणे-३९ येथे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जायका चायने चहाप्रेमींना मंत्रमुग्ध केलं आहे.

‘जायका चाय’ यामध्ये फक्कड चहासोबतच कॉफी, १० प्रकारचे सोडा अशा अनेक प्रकारचे पेय मिळतात. सोबतच यामध्ये पाणी-पुरी, चाट सेंटर, फ्रेंच फ्राईज, सॅन्डवीच, मोमोज (पूर्ण व्हेज), चवदार स्प्रिंग पोटॅटो असे अनेक प्रकारचे चवीष्ट फास्ट फुडदेखील मिळतात. यामुळे जायका चायने फक्त पुणेकरांनाच नाही, तर बाहेरून पुण्यात येणार्‍या लोकांनासुद्धा भुरळ घातली आहे.

अशा सर्व गोष्टींमुळे ‘जायका चाय’ घेऊन प्रत्येक चहाप्रेमी मंत्रमुग्ध तर होतोच, पण तेथील आदरातिथ्य पुन्हा पुन्हा येथे यायला भाग पाडतं. सोबतच उन्हाळ्याच्या या दिवसांत १० प्रकारचे सोडा येथे उपलब्ध आहेत, अगदी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणार्‍या माफक दरात. हे हॉटेल सकाळी-सायंकाळी व्यायामाला, बाहेर फिरायला जाणार्‍या तरुण,वृद्ध अशा सर्व चहा पिणार्‍या चहाप्रेमींसाठी आहे. त्यामुळे जर तुम्ही भोसरी, पुणे या परिसरात राहत असाल किंवा जरी तुम्हला फक्कड चहा पिण्याची इच्छा झाली तर ‘जायका चाय हॉटेल’ला नक्की भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये