आरोग्यपुणेफुड फंडामहाराष्ट्र

फूड फंडा : अस्सल तर्रीदार मिसळसाठी धाराऊ मिसळ हाऊस

पुणेकरांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ. मिसळचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर नेहमी तयार असतात. कारण मिसळ म्हटलं की मिसळप्रेमींच्या डोळ्यासमोर येतो तो तर्रीदार तिखट रस्सा, मटकी- फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण सोबत थंडगार ताक.. अहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळचे एवढे वर्णन पुरेसे ठरावे. तर असे मिसळप्रेमी मिसळची चव सुटली की हौसेने आस्वाद घ्यायला जातातच, तर अशाच खवय्यांसाठी धाराऊ स्पेशल मिसळ हाऊस प्रसिद्ध आहे.

विर धाराऊ मिसळ हाऊस हे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई विर धाराऊ गाडेपाटील यांचे वंशज अमित गाडेपाटील यांचं आहे. या बारामावळचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले धाराऊ स्पेशल मिसळ जय महाराष्ट्र हाॕटेलची धाराऊ स्पेशल मिसळ हाऊसने खवय्यांना त्यांची चविष्ट मिसळ खाऊ घालून तृप्त केलं आहे. सोबतच या मिसळ हाऊसने त्यांच्या मिसळची चव अस्सल ठेवल्याने येथे खवय्यी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. तसेच धाराऊ मिसळ हाऊसची स्पेशल मिसळ, पावभाजी, कोल्ड कॉफी, दहीवडा, सँण्डवीच असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहे. तसेच या मिसळ हाऊसमध्ये मिसळप्रेमी फक्त पुण्यातूनच नाही तर बाहेरील ठिकाणांहून येणारे खवय्यी व नामवंत दिग्गज येथे सातत्याने भेट देत असतात.

जय महाराष्ट्र हाॕटेलची धाराऊ मिसळ हाऊस हे एचपी पेट्रोलियम शेजारी, कापुरव्होळ (ता. भोर) पुणे सातारा महामार्गावर आहे. तसेच या मिसळ हाऊसचे आदरातिथ्याने मिसळप्रेमी आकर्षित होतात. तसेच धाराऊ मिसळ हाऊसमधील सर्व पदार्थ सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडेल अशा दरात उपलब्ध होत असल्याने या हाऊसमध्ये खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. तर तुम्हालाही चविष्ट मिसळ आणि अन्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की धाराऊ स्पेशल मिसळ हाऊसला भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये