‘देवेंद्र फडणवीसांचा फोटो पाहून एकनाथ खडसेंनी गायलं ‘हे’ गाणं’; व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई : झी मराठी या वाहिनीवरील किचन कल्लाकार हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. तसंच या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती देखील दर्शवली आहे. किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत कलाकारांसोबत अनेक राजकीय नेते मंडळीही सहभागी होताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी नेते रोहीत पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, महापौर किशोरी पेडणेकर, भाजपा नेत्या चित्रा वाघ असे अनेक नेतेमंडळी उपस्थित राहीले होते. यादरम्यान आता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमय्या सहभागी झाले आहेत.
एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणं गातांना दिसले. त्यानंतर त्यांना एक फोटो दाखवला जाईल आणि त्यावर त्यांना जे गाणं सुचेल ते गायला सांगितले. यावेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहून एक गाणं म्हटलं आहे.
किचन कल्लाकारमध्ये एका खेळा दरम्यान, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला. यावेळी फोटो बघून त्यांना गाणं गायला सांगितलं असता. ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हे गाणं एकनाथ खडसे गातात. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात.