देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेला केवळ, 4 दिवसांत 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान..
HDFC Bank Market Cap : HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC बँकेचे शेअर्स गेल्या काही दिवसांत 6 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज कंपन्या अजूनही एचडीएफसी बँकेच्या शेअर्सबद्दल आशावादी आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सध्या एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 11.59 लाख कोटी रुपये आहे.
HDFC बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1,557 रुपयांवर उघडले आणि 2.11 टक्क्यांच्या घसरणीसह 1,524 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले. शेअर बाजार बंद झाला तेव्हा बँकेचे शेअर्स 1.57 टक्क्यांच्या घसरणीसह 1,529 रुपयांवर बंद झाले.
एचडीएफसी बँकेने गेल्या सोमवारी विश्लेषकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एचडीएफसी बँकेने सांगितले की त्यांचे नेट वर्थ आणि मालमत्तेमध्ये अल्पावधीत घसरण होऊ शकते.