पद आणि तिकिटासाठी नवनीत राणांची भाषा बदलली ; रोहित पवार
जालना : महाराष्ट्रात सध्या शिवसेना विरुद्ध राणा असा वाद चांगलाच पेटला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसावर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आजून आक्रमक झाली . यात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासदार नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले कि, नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यांचं पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवं असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी.तसेच भाजप निवडून येण्यासाठी काहीही करू शकते असा जोरदार टोला हि लगावला .
तसेच रोहित पवार यांनी आयोद्या दौऱ्यावर जाणारे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण देखील केली. आयोद्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांनी टीका करणं सुरू केलं परंतु निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असताना ते बोलत होते.
याचप्रमणे भाजपला लोकशाही मार्गाने विजय मिळवता येत नाही .सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा यांना हाताशी धरून मुंबई महापालिकेची निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन महविकास आघाडी ला टार्गेट करत आहेत तसेच गेल्या अनेक दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केलं आहे असेही रोहित पवार म्हणाले.