महाराष्ट्र

पवन एक्सप्रेस रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक जण ठार, अनेक जखमी


नाशिक : नाशिकजवळच्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ पवन एक्सप्रेस रेल्वेचे डबे रुळावरून खाली घसरल्याचे धक्कादायक घटना रविवारी ४ एप्रिल दिवशी घडली. नाशिकजवळील लहवित – देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले.

रविवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास नाशिकजवळील लहवित- देवळाली या स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एलटीटी – जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत रेल्वेकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मध्य रेल्वेने ट्विटरवर अपघाताची माहिती दिली असून यात मदत पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये