पोलीसांआधी मीडिया पोहोचते? महसूल मंञ्याचा सरकारला घरचा आहेर
नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गोंधळ म्हणजे राज्यातील पोलीस यंत्रणेच्या गोपनीय माहिती मिळवणाऱ्या यंत्रनेचे अपयश आहे. अलीकडे वारंवार हे अपयश पुढे येेत आहे त्यामुळे घटनास्थळी आधी कॅमेरामन पोहोचतात नंतर पोलीस पोहोचतात. अशा शब्दात टीका करीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गृह विभागाला घरचाच आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे. ते नाशिक येथे माध्यामांशी शरद पवार यांच्या निवासस्थानी घडलेला प्रकार गँभीर आहे. गोपनीय सुरक्षा यंत्रणेचे हे अपयश आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल दंडाधिकारी हे आरडीएक्स तर त्याचे अधिकार डिटोनेटर असल्याने त्यांचे अधिकार काढावेत असे पत्र दिले. महसूल मंत्री थोरात यांनी पांडे यांच्या विधानावर टीका केली.
महसूल अधिकारी हे आरडीएक्स तर भूमाफिया डिटोनेटर आहेत असे म्हणत लेटर बॉम्ब टाकलेले पोलीस आयुक्त दीपक पांडे आपल्या पत्रावर ठाम असल्याचा पुर्नउच्चार केला आहे. पोलिस आयुक्तांच्या ठाम मतांकडे कसे पहाता याविषयी विचारले असता, पोलीस आयुक्तांनी यंत्रणेतील दोष दाखवायला हरकत नाही. त्यांनी चूक दाखवली पाहिजे आम्ही ती चूक दुरुस्तही केली पाहिजे. पण त्यांवर जाहीरपणे विधान करणे योग्य नव्हतेच असेही थोरात यावेळी म्हणाले आहेत.