इतरक्रीडाताज्या बातम्या

बंगळूरचा दिग्गज खेळाडू हर्षल पटेल ‘या’ कारणामुळे आयपीएलमधून पडला बाहेर

मुंबई : शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दणदणीत विजय नोंदवत मुंबईला धूळ चारली. बंगळुरुने हा विजय सात गडी राखून मिळवला आहे. या विजयानंतर बंगळुरु थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादरम्यान आता बंगळुरुचा खास गोलंदाज हर्षल पटेलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हर्षलच्या बहिणीचे निधन झाल्यामुळे त्याला सध्या आयपीएल सोडावा लागला आहे. हर्षल पटेल बायोबबलच्या बाहेर पडला आहे.

आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं आहे. त्यामुळे ही दु:खद बातमी समोर येताच हर्षल पटेल घरी परतला आहे. तो बायोबबलच्या बाहेर पडला असून तो काही दिवसानंतर परत संघात सामील होणाार आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या बहिणीची प्रकृती मागील अनेक दिवसांपासून बिघडलेली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये