पुणेताज्या बातम्या

भोंगा प्रकरणानं मनसेतच वाद; ‘यामुळं’ वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

पुणे : मशिदीवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरेंच्या निर्णयानं पुण्यात मनसेच्या अंतर्गत राजकारणात वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. माणसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं खुद्द मनसेअध्यक्ष ठाकरे यांनी मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आणी साईनाथ बाबर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन शहराध्यक्ष असतील अशी घोषणा देखील केली आहे. वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं होतं.

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण मनसेमधील अंतर्गत वादालाच जास्त कारणीभूत ठरल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत यासंदर्भातील आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आज मुंबईला बोलावून घेतले होते. मात्र, यामध्ये वसंत मोरेंचाच सहभाग नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीच वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये