ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राज्यपालांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… “छत्रपतींचे वंशज कधीच हतबल…,” 

मुंबई : (Devendra Fadnavis On Udayanraje Bhosale) महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेली आक्षेपार्ह वक्तव्य हे कोश्यारी यांना चांगलेच भोवले आहे. राज्यातील जनतेची तीव्र नाराजी पाहता, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या राज्यात परत राज्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, “छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होवू शकत नाहीत, उदयनराजे यांच्या मागे महाराष्ट्र आहे, राज्यपाल हे पद संवेदनीक पद असते, सरकार त्याला काहीही करू शकत नाही राज्यपालांचा राजीनामा घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो, उदयनराजेंच्या भावनांच्या पाठीशी आम्ही सगळेजन ठामपणे आहोत”

पुढं फडणवीस म्हणाले “छ.शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणा स्त्रोत दुसरा कोणी असू शकत नाही, राज्याचे आणि देशाचे आदर्श शिवाजी महाराजच आहेत” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये