ताज्या बातम्यामहाराष्ट्रहिस्टाॅरिकल

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रतापगडावर शिवप्रताप दिन होणार सपन्न!

सातारा : किल्ले प्रतापगडावर बुधवार दि ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शिवप्रताप दिनाचे आयोजन प्रशासनाने केले आहे. मुख्य बुरूजावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकाविण्यात येणार आहे. शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडाला फुलांनी सजविण्यात येत असून संपुर्ण गडाला विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच या दिवशी प्रशासन व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबर परीसरातील अनधिकृत बांधकाम मागील वीस वर्षांपासुन वादात अडकले होते. हे बांधकाम काढून टाकावे यासाठी देशभरातील शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटना अधिक आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे हा परीसरात कायम तणावपुर्ण स्थिती झाली होती. परीसरात प्रवेश बंदी करून तेथे कायम मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

राज्य शासनाच्या आदेशाची अंमजलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे स्वतः किल्ले प्रतापगडावर कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ले प्रतापगडावर येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये