राज ठाकरेंनी केल्या दोन मोठ्या घोषणा…

पुणे : आज पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महत्वाच्या दोन घोषणा केल्या आहेत . यावेळी राज ठाकरे म्हणाले की, येत्या १ मे ला म्हणजे महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे . तसेच ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणारा असल्याची माहिती ही त्यांनी दिली. याचप्रमाणे मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून ही त्यांनी जोरदार घोषणा केली.
शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील खालगर चौक येथील मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंग्याच्या विषयावर भाष्य करत उदाहरणही दिली. तसेच ‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, त्याच्या आवाजाचा त्रास सर्वानाच होतो त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर दिले जाईल असेही राज ठाकरे म्हणाले.तुम्ही शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवणार’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिल.
ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर महाराट्रातील राजकारण कोणते वळण घेते हे पाहणं रंजक ठरेल. तसेच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून मागे हटणार नसल्याचं हि स्पष्ट केलं आहे .