स्मार्ट उद्योजकफिचर

वास्तुशास्त्राची जोड देत केला अनुभवसिद्ध व्यवसाय…

वास्तुशास्त्राला हजारो वर्षांपासूनचा इतिहास लाभला आहे. आजदेखील आपण वास्तुशास्त्राचा आधार घेत अनेक दैनंदिन गोष्टींची पडताळणी करत असतो. २००२ मध्ये जन्मपत्रिका वास्तुतज्ज्ञ, रत्नतज्ज्ञ एज्युकेशन, एमकॉम, डीएफएम हे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाची वास्तुशास्त्राशी सांगड घालत सौ. सुलक्षणा क्षीरसागर यांनी वास्तुशास्त्र व्यवसाय निवडला. आज त्यांच्या गाठीशी वीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक पुणेकरांना वास्तुशास्त्रानुसार योग्य मार्ग दाखवला आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्येचे निराकरण सुलक्षणा यांनी केले आहे.

त्यांच्याकडे जन्मपत्रिकेवरून तारखेप्रमाणे भाकितासोबत अनुभवसिद्ध उपाय दिले जातात. गेली वीस वर्षे या क्षेत्रात त्या काम करतात. आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक आणि करिअर या गोष्टींचा विचार करून पत्रिका पाहिली जाते. तारखेनुसार भाकितामुळे आयुष्याचा आलेख कळतो व घडणार असलेल्या गोष्टीची एक प्रकारे पूर्वसूचना मिळते. काही गोष्टी अगोदर समजल्यानंतर त्यानुसार आयुष्याचे पूर्वनियोजन करणे सोपे जाते. अनुभवसिद्ध उपायांनी गोष्टींची तीव्रता कमी-जास्त केली जाते, अडचणी येणार असतील तर त्या कमी करता येतात आणि त्यानंतर आनंद येणार असेल तर तो वाढवता येतो. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वास्तू ही चौकोनी किंवा आयताकृती असणे आवश्यक असते. परंतु आजकाल अशी वास्तू फार कमी बघायला मिळते.

इमारतीमध्ये फ्लॅट असेल तर त्याला कोणत्या ना कोणत्या तरी एका एक किंवा दोन दिशांना कट असतोच आणि मग या दोषयुक्त वास्तूमुळे आपल्या जीवनाच्या कोणत्यातरी भागावर त्याचा परिणाम दिसून येतो. अशा वेळी वास्तूमध्ये कोणतेही बदल न करता विनातोडफोड वास्तु उपाय केले जातात. त्यामुळे चुंबकी क्षेत्र संतुलित केले जाते. रत्न आणि शुद्ध धातूची यंत्रे तिथे वापरली जातात. रत्न एक नैसर्गिक खनिज आहे, जे आपल्याला खाणीतून प्राप्त होते. आपल्याला कोणत्या ग्रहाचे पाठबळ कमी आहे. त्याचा पत्रिकेवरुन सारासार विचार करून रत्न सुचवले जाते. प्रत्येक रत्न हे त्या प्रत्येक ग्रहाची ऊर्जा वाढवते. त्यामुळे आयुष्याला एक चांगला आधार मिळतो. रत्न रेकीच्या शुभ ऊर्जेने प्रभारित करून दिल्यास त्याचे लवकर शुभ परिणाम दिसतात.

अनेक लोक काही ना काही समस्येतून जात असतात. मग कौटुंबिक, शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक, सामाजिक, राजकीय, या क्षेत्रातील लोक गोष्टींना सामोरे जातात, पण यश काही प्राप्त होत नाही. असे काही तुम्ही अडचणींनी त्रस्त असाल तर सौ. सुलक्षणा क्षीरसागर यांची एकदा अवश्य भेट घ्या. तुम्हाला समस्येतून बाहेर पडण्यासाठी योग्य उपाय व मार्गदर्शन त्या नक्कीच करतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये