वैद्यकीय ‘मॉप-अॅप’ फेरी अखेर रद्द झाली
पुणे ः वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन मुख्य फेर्या झाल्यानंतर घेण्यात येत असणारी ‘मॉप अॅप’ फेरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता दुसर्या फेरीत प्रवेश न मिळवणार्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्यास मुभा मिळाली आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली. एमडी/एमएस पदव्युत्तर पदविका वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सुरू झालेल्या प्रवेशाची पहिली यादी २८ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. या प्रवेश फेरीमध्ये १,८६५ जागा होत्या. यापैकी दुसर्या फेरीत प्रवेश पूर्ण करूनही ४१४ जागा रिक्त राहिल्या होत्या.
या रिक्त जागांवर प्रवेश पूर्ण करण्यासाठी ‘मॉप अॅप’ फेरी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या अॅप फेरीच्या विरोधात विद्यार्थी व पालकांनी निर्णय घेतला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेशाच्या मुख्य दोन फेर्या केल्यानंतर. होत असलेली ही मॉप अॅप फेरी रद्द केली आहे. यामुळे दुसर्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची मुभा मिळाल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसर्या फेरीनंतर एक मॉप अॅप फेरी झाली. मात्र ही मॉप अॅप फेरी फक्त शासकीय महाविद्यालयांसाठी घेतली गेली. या अॅपची शेवटची तारीख ४ एप्रिल रोजी झाली आहे.