ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

सरकार जोमात शेतकरी कोमात! भाव मिळेना म्हणून, मागील वर्षीचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात

Cotton Price : शेतकऱ्यांच्या कापसाला (Cotton) चांगला भाव मिळेल या आशेने अजूनही कापूस घरातच ठेवला आहे. जून महिन्याच्या अखेरीस पडत्या भावात शेतकऱ्यांवर कापूस विकण्याची वेळ आली होती. तर अनेक शेतकऱ्यांनी क्विंटलमागे साडेसहा ते सात हजार रुपयांच्या भावाने कापूस विकला आहे. 17 जुलै रोजी कापूस खरेदी बंद होईल अशा सूचना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत कापूस बाजारात आणला होता. कापसाला 15 जुलै रोजी सात हजार दोनशे रुपये इतका भाव मिळाला.

मात्र, काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने अजूनही कापूस घरातच ठेवला आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कापसाचा मुद्दा मांडण्यात यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसंच शेतकऱ्यांची ही कापूस कोंडी विरोध आक्रमकपणे शेतकऱ्यांसमोर मांडू शकले नाही तर सरकार देखील शेतकऱ्यांचा शेतमालाल भाव देऊ शकणार नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

मागील वर्षी कापसाला पंधरा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही कापसाला तितकाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. भावातील चढउतारामुळे शेतकरी कापूस भाव वाढण्याची आशा बाळगून होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये