आझम कॅम्पसमध्ये ध्वजारोहण; ‘फ्युचर इंडिया’ संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे | महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी ‘चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते फंक्शन ग्राउंड येथे सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांची मार्च पास्ट लक्षवेधक होती.
मार्च पास्ट मधून टीम भावना आणि उत्तम सादरीकरण तसेच सांप्रदायिक बंधने दिसून येत होती. यामध्ये टीम संयोजन आणि अनुशासन दिसून आले. मार्च पास्ट करताना आझम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लयबद्धता होती. यामध्ये आबेदा इनामदार सीनियर कॉलेज, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, एमसीईएस इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पी ए आय पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आबेदा इनामदार जुनियर कॉलेज, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, एचजीएम आझम उर्दू प्रायमरी स्कूल, तयाबिया ऑर्फनेज या संस्थानचा समावेश होता.
त्यानंतर ‘फ्युचर इंडिया’ संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी, विद्यार्थिनीनी सादर केला. शैक्षणिक, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यटन, खेळ अशा अनेक विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्थानी असेम्ब्ली हॉल येथे सकाळी सव्वा नऊ वाजता सादर केलाआहेत. संस्थेचे उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव प्रा.इरफान शेख, शाहीद इनामदार, एस.ए.इनामदार, डॉ.आरिफ मेमन, डॉ. नाझिम शेख, शाहीदा सय्यद,विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक, शिक्षकवर्ग, कर्मचारी उपस्थित होते.