अखेर प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबई | Maharashtra SSC Result 2023 – गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या बोर्डाच्या निकालाची धाकधूक विद्यार्थ्यांना लागली होती. तर आता प्रतीक्षा संपली आहे, कारण उद्या (2 जून) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
उद्या दहावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार आहे. तसंच महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यलयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल कुठे पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दहावीचा निकाल https://mahahsscboard.in/ आणि https://mahresult.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. तर निकाल पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर लाॅग इन करा. त्यानंतर महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 या लिंकवर जा. तिथे तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाका. त्यानंतर लाॅग इन करत तुमचा दहावीचा निकाल तपासा.