ताज्या बातम्यादेश - विदेश

मुंबईत एचआयव्ही, सिफिलीसची ११९ जणांना बाधा

मुंबईतील अनेक लोक मैत्री व शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अॅप्लिकेशन व वेबसाईटचा वापर करतात. मात्र, या गरजा भागविण्याच्या नादात एचआयव्हीचे संक्रमण ओढून घेतात. हे त्यांना माहित होईपर्यंत अनेक लोकांना या संसर्गाची बाधा होते. जिल्हा एड्स नियंत्रण मुंबई सोसायटीने २९ महिन्यांत १०५६ अॅप किंवा सर्च बॉक्समध्ये एड्सबाबत चॅट करणे, माहिती सर्च करणारे नागरिक ट्रेस करून त्यांची एचआयव्हीची तपासणी केली. त्यात ११९ लोकांना एचआयव्ही आणि सिफिलीसची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

बोलण्याची आवड आणि त्यातून सुरू होणारी मैत्री नंतर डेटिंगपर्यंत पोहचते. यानंतर ही मैत्री शारीरिक गरजा पूर्ण करेपर्यंत जाते. यासाठी व्हाट्सअॅप, इंस्टाग्राम, ग्रिडर, ब्लूड, इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर होतो. जिल्हा एड्स नियंत्रण मुंबई सोसायटीने एम डॅक्स हेल्थ केअर वर्कर नावाने प्रोफाईल बनविली. अॅप किंवा सर्च बॉक्समध्ये एड्स बाबतच्या चॅट करणे, माहिती सर्च करणारे नागरिक ट्रेस करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. १००० जणांमध्ये १०० जणांनी याबाबत बोलण्यास सुरुवात केली. अन्य लोकांनी या हेल्थ केअर वर्करशी बोलणे टाळले किंवा ब्लॉक करण्याचा पर्याय निवडला. सल्ला मिळाल्यानंतर माहिती गुपित ठेवण्याबाबत तसेच लगेच उपचाराबाबत विचारणा केली. यातील ५० जण तपासणीला आले. दोन्ही आजारांचे एकूण २९ महिन्यांत ११९ जण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यापैकी ९८ लोकांवर उपचार केले. ते म्हणाले की, २६ एचआयव्ही आणि ७२ एसटीडीचे उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये