देश - विदेश

‘1980 मध्ये मला सगळे सोडून गेले होते पण…’, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

मुंबई : (Sharad Pawar On Ajit Pawar) राजकीय वर्तुळात आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर 8 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परकर परिषद घेत याबाबतची आपली भूमिका मंडळी आहे.

यावेळी पवार म्हणाले की, “मला आनंद आहे. आज मंत्री मंडळामध्ये ज्या नेत्यांनी शपथ घेतली त्या नेत्यांवर केलेल आरोप खोटे असल्याचे त्यांनी दाखवले आहे. 6 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती, मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही”, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं त्यापैकी 3 ते 4 जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. मी फक्त काही जणांचा नेता होतो, मी पक्ष पुन्हा बांधला. जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार असंही शरद पवार पुढे म्हणाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये